Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमोदींच्या बंगालमधील सभा रद्द : कोरोनावर उद्या उच्चस्तरीय बैठक

मोदींच्या बंगालमधील सभा रद्द : कोरोनावर उद्या उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली:

देशात ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसेवीरचा तुटवडा, वाढणारे कोरोना रुग्ण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी होणाऱ्या चार सभा रद्द केल्या आहेत. उद्या त्यांनी उच्चस्तरीय बैठक (high-level meetings) बोलवली आहे. स्वत: पंतप्रधानांनी टि्वट करुन ही माहिती दिली. कोरोनावरुन आजच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते.

- Advertisement -

कोरोना संकटावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले : या ४ मुद्द्यांवर मागितला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशात ऑक्सीजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये. त्याच पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा (Shortage Of Medical Oxygen) बंद केला जाणार आहे, असा आदेशच मोदी सरकारने आज काढला. गृहसचिवांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अखंड आंतरराज्यीय पुरवठ्याबाबत संबंधित विभागांना अगोदर सूचना देण्यात याव्यात. कोणत्याही ऑक्सिजन उत्पादक किंवा पुरवठादारावर कोणतेही बंधन नसावे. ज्या ठिकाणी प्लांट आहेत तेथेच ऑक्सिजन देता येणार आहेत.

नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

ऑक्सिजन जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ऑक्सिजन नेणारी वाहने थांबवली जाणार नाहीत. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात ऑक्सिजन नेणार्‍या वाहनांना कोणतेही बंधन असणार नाही. ऑक्सिजन उत्पादकांना त्यांचा पुरवठा कोणत्याही एका राज्यात किंवा शहरातील रुग्णालयात पाठवण्यास सांगता येणार नाही. शहरांमध्येही ऑक्सिजन असणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधने येणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या