IPL 2023 : 'या' तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव; बेस प्राईस किती? वाचा सविस्तर

IPL 2023 : 'या' तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव; बेस प्राईस किती? वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) लिलाव (Auction) २३ डिसेंबरला कोचीमध्ये (Kochi) होणार आहे.या लिलावासाठी ४०५ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली असून लिलावात फक्त ८० ते ८५ खेळाडूंची खरेदी होऊ शकते. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर अधिक बोली लागते याकडे चाहत्यांच्या नजर लागल्या आहेत...

आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांनी ३६ अतिरिक्त खेळाडूंसाठी (Players) विनंती केल्याने ही यादी ४०५ वर पोहोचली. त्यामध्ये २७३ भारतीय, १३२ विदेशी तर ४ खेळाडू हे असोसिएट नेशन्समधील आहेत. तसेच लिलावासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये ११९ कॅप्ड तर २८२ अनकॅप्ड खेळाडू आहेत.

तर आयपीएलच्या १० संघांकडे केवळ ८७ स्लॉट असल्याने २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये ३० परदेशी खेळाडू निवडता येणार आहेत. तर ११ खेळाडूंनी दीड कोटी रुपये बेस प्राईस दिली असून भारताच्या मनीष पांडे आणि मयंक अग्रवाल या दोन खेळाडूंची बेस प्राइज १ कोटी इतकी आहे. याशिवाय १८ परेदशी खेळाडूंची बेस प्राईस एक कोटी रुपये इतकी आहे.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडे (Sunrisers Hyderabad) खेळाडू विकत घेण्यासाठी ४२.२५ कोटी इतकी रक्कम असून त्यांना १३ खेळाडू खरेदी करता येतील. तर कोलकाता नाइट रायडर्सकडे (Kolkata Knight Riders) ७ कोटी ५ लाख रुपये असून त्यांचे ११ स्लॉट रिकामे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com