Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशरेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तिप्पट वाढ

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तिप्पट वाढ

नवी दिल्ली :

आता रेल्वे स्थानकावर मित्र, नातेवाईकांना सोडयला जाणार असाल तर तुमच्या खिशाला अधिक फटका बसणार आहे. सर्वच रेल्वे स्थानकावरील तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये पाच पट वाढ झाल्यानंतर आता भारतीय रेल्वेकडून देशातील सर्वच प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ केली आहे. १० रुपयांना मिळणारे प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ही ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मध्य रेल्वेने मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५० रुपये केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या