करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला का वगळलं?, जाणून घ्या कारण

करोना उपचारासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला का वगळलं?, जाणून घ्या कारण

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दरम्यान करोनावरील उपचारांमध्ये महत्वाची मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. याबाबत AIIMS आणि ICMR कडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. करोनाबाबत टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे अन् पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की करोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही तर्कहीनपणे उपयोग केला जात आहे. त्यामुुळे बैठकीत प्लाझ्मा थेरपी करोना उपचार पद्धतीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच टास्क फोर्सनं कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार, कोविड रुग्णांना तीन प्रकारांत विभागण्यात आलं आहे .

1. अगदी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2. मध्यम तीव्रतेची लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना कोविड वॉर्डमध्ये दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे

3. गंभीर लक्षणं असलेली रुग्ण - या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी ICMR, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवले होते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसेच काही संशोधकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय ICMR आणि दिल्लीतील AIIMS संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com