जमिनीची धूप रोखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा !

जमिनीची धूप रोखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा !

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय संस्कृतीत ( Indian culture )झाडांच्या पूजेचे विशेष महत्व दिले आहे. झाडे व जमीन ( Trees and land) यांचे देखिल घट्ट नाते आहे. दोन्ही घटक परस्पर विकासासाठी अपरिहार्य आहेत. झाडाची मुळे जमिनीला बांधून ठेवतात, ज्यामुळे मातीची ( Soil ) धूपही होत नाही आणि जमीन पाणी चांगले शोषून घेते. हे पाणी जमिनीत मुरते आणि माणसाला प्रसंगी पाण्याच्या कमतरतेपासून वाचवते. झाडे आपल्याला सावली देतात. पक्षांचा अधिवास बनतात.

अमूल्य अशा वृक्षसंपदेच्या वारेमाप तोडीमुळे, ग्लोबल वार्मिंग, दुष्काळ, जमिनीची धूप यासारख्या भयंकर समस्या निर्माण झालेल्या आहेत. जर आपल्याला ही नैसर्गिक आपत्ती टाळायची असेल तर झाडांचे संवर्धन करायलाच लागेल.

प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्ष तोडीमुळे दरड कोसळणे, जमीन धसणे अशा घटना अनेकदा घडतात. त्यासोबतच जंंगलतोडीने जैवविविधताही नष्ट होत चालली आहे. वन्य प्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने येऊ लागले आहेत.

वृक्ष व वनस्पतींची मुळे माती घट्ट धरुन ठेवतात. मातीची सहजासहजी धुप होत नाही. दुसरे म्हणजे वनस्पतीमुळे जमिनित सूक्ष्म जीव निर्माण होतात. जमीन भुसभुशीत करतात. त्यामुळे जमिनीत मुरते. भूजलपातळी वाढण्यास मदत होते .परंतु वृक्ष तोड केल्यामुळे हे आच्छादन नष्ट होवून जमिनीची धूप होण्यास चालना मिळते.

जमिनीच्या वरच्या स्तरातही पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा साठा असतो. हा वरचा स्तरच वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते व त्याचा विपरीत परिणम शेतीच्या उत्पादनावर होतो. झाडांच्या पाल्यापाचोळ्यामुळे नव्या मातीच्या निर्मितीला गती मिळत असते. त्यातून जमिनीचा कसही सूधारण्यास मदत होते. पशु पक्षांची विष्ठा ही जमिनीला पोषक द्रव्य देते. विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात असतील तर नुकसान भरपाई म्हणून तोडीच्या दहा पटीने वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. तरच जमिनीची धूप कमी होण्यास मदत होईल व त्यातून जिवसृष्टीचे जतन करणे शक्य होणार आहे.

झाड जगवणे महत्वाचेच!

योग्य ठिकाणी योग्य झाडांची लागवड करण्यातून मातीचे संरक्षण होणार आहे. झाडांची संख्या वाढली तर जमिनीतील पाण्याचा स्तर वाढण्यास मदत होणार आहे. त्यातूनच मातीचे जतन होणार आहे. केवळ वृक्षारोपण करुन भागणार नाही तर त्या झाडाची सलग 3 वर्षे जोपासना करणे गरजेचे आहे. तरच झाड जगणार आहे. आणि त्या माध्यमातून जमिनीचे मातीचे जतन होणार आहे. प्रत्यक्षात यासाठी थोडा वेळ काढून काम करणे गरजेचे आहे.

शेखर गायकवाड, संस्थापक, आपलं पर्यावरण संस्था

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com