Video जळगावात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, १ ठार, १ गंभीर

Video जळगावात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, १ ठार, १ गंभीर

चोपडा (प्रतिनिधी)

जळगाव ( Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पहाडी भागात प्रशिक्षणार्थी विमान (plane crash) कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शिरपूर एअरपोर्टचे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी असलेले हे विमान आहे. या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेत पायलेटचा (pilot) मृत्यू झाला असून प्रशिक्षणार्थी महिला पायलेट गंभीर जखमी आहे.

तालुक्यातील वड्री येथे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील आदिवासी बांधवांनी गर्दी केली आहे. या घटनेत पायलेट नुरुल अनिल यांचा मृत्यू झाला आहे. तसेच प्रशिक्षार्थी महिला पायलेट अनिष्का लखन गुजर (वय २८, रा. परीधर, बडवानी, मध्य प्रदेश) गंभीर जखमी आहे.

Video जळगावात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, १ ठार, १ गंभीर
SSC Result दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरू होणार कधी?

घटनास्थळी तहसीलदार अनिल गावित यांनी यांनी व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली. गंभीर जखमी असलेल्या अनिष्कावर वैद्यकीय अधीक्षक मनोज पाटील, गुरुप्रसाद वाघ यांनी गंभीर प्रशिक्षणार्थी पायलेटवर उपचार केले. त्यानंतर तिला मुंबईत हलवण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com