लसीकरणाचे प्रभागनिहाय नियोजन करा

- अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची महापालिका आयुक्तांना सूचना
लसीकरणाचे प्रभागनिहाय नियोजन करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शहरातील करोना प्रतिबंधित लसीकरणाचा Corona Vaccination वेग वाढावा यासाठी प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास Additional Chief Secretary of the Health Department Dr. Pradeep Vyas यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना Municipal Commissioner's दिल्या आहेत.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. येत्या १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डॉ. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.

सर्व आयुक्तांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घ्यावी. बैठकीत महसूल, शिक्षण, महिला बालविकास, नगरविकास अशा विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे. लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय नियोजन करावे. कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करावे. एका प्रभागाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लसीकरण करावे.

पहिल्या डोसचे प्राधान्याने आणि दुसरा डोस देय असलेले लसीकरण करावे. लसीकरणासाठी डॉक्टर, अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, इंटर्नस यांनी व्हैक्सिनेटर म्हणून काम करावे.लसीकरण सत्रापूर्वी दोन दिवस अगोदर जनजागृती करावी. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा, समाजमाध्यमे यांचा वापर करावा. उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी सत्रांचे नियोजन करावे, अशा सूचना डॉ. व्यास यांनी केल्या आहेत.

Related Stories

No stories found.