गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त?

..तर ठेकेदार काळ्या यादीत : मनपा आयुक्त
गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेच्या ( NMC ) सहाही विभागात सतर्क राहून बांधकाम विभागाकडून खड्डे ( Pits )बुजवले जात आहेत. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश दिले आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु असून आगामी गणेशोत्सव सणाच्या पूर्वी शरीरातील रस्ते खड्डे मुक्त ( Pits Free Roads ) करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून आहे.

मनपाकडून सातपूर विभागात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 पपया सर्कल ते पिंपळगाव बहुला रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. प्रभाग क्रमांक 9 मधील शिवाजीनगर बस स्टॉप रस्ता आणि श्रमिकनगर स्वामी समर्थ केंद्र लगतच्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले. प्रभाग क्रमांक 11 एमआयडीसी-सीएट रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. पश्चिम विभागातील वाघ गुरुजी शाळा परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. याच विभागात महात्मा नगर रस्त्यावरील खड्डे जीएसबी मटेरीअलने भरण्यात आले आहेत. पूर्व भागात तपोवनरोडला ड्रीम सिटी चौकात प्रभाग क्रमांक 16 मध्ये रोड साईडपट्टी स्वच्छ करण्यात आली आहे.

नाशिकरोड भागात जेलरोडला करन्सी नोट प्रेससमोरील रस्त्यालगतचा गाळ काढण्यात आला. एमजी रोडवरील गाळही काढण्यात आला आहे. नवीन नाशिक विभागात इमलशन मटेरीअलने खड्डे बुजवण्यात आलेत. अंबड एमआयडीसी एम सेक्टर, एक्सलो पाईंट, प्रभाग क्रमांक 29 स्वामी विवेकानंद चौक, इन्कम टॅक्स कोलनी, कर्मयोगीनगर, पाथर्डी हरीविश्व या भागातील खड्डे बुजवण्यात आलेत.

..तर ठेकेदार काळ्या यादीत : मनपा आयुक्त

मागील सुमारे एक महिन्यापासून शहरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची मनपा आयुक्तांनी दखल घेतली असून बांधकाम आणि गुणवत्ता विभागाच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहे.

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असला तरी खड्डे कायम आहे. काही ठिकाणी डांबर वाहून गेल्याने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम आणि गुणवत्ता विभागाने नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन सर्व विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये गुणवत्ता तपासणी विभागाला चांगलेच धारेवर धरले. तुमच्या कामात सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला. त्याचप्रमाणे जे ठेकेदार योग्य काम करत नसेल त्यांना नोटीस देऊन काळ्या यादीत टाकण्याचे सूचना देखील त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com