Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या रणरागिणी चालविणार 'पिंक रिक्षा'

नाशिकच्या रणरागिणी चालविणार ‘पिंक रिक्षा’

नाशिक | फारुक पठाण | Nashik

महिला आता कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही. यामुळे आता सर्व क्षेत्रात महिलांची भागादारी वाढत आहे. नाशिक महापालिकेच्यावतीने (Nashik Municipal Corporation) महिलांना आता रिक्षा चालविण्याचे धडे (Auto rickshaw driving training) देण्यात येणार आहे…

- Advertisement -

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी पिंक रिक्षा योजना (Pink rickshaw scheme) सुरू होणार आहे. याबाबतचे टेंडरींग झाले असून वर्क ऑडर मिळाले तर प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे….

मागील सुमारे दोन वर्षापासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. शहरातील मनपाच्या सहाही विभागातून महिला प्रशिक्षणासाठी अर्ज मिळाले होते. त्यांची छाननी करुन यातील 277 महिलांची अंतिम निवड प्रशिक्षणासाठी झाली आहे. आदेश आल्यावर पहिल्या टप्प्यात 60 महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे.

यासाठी मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने (Women and Child Welfare Department) 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी करोनामुळे (Corona) वर्क ऑर्डर निघाले नव्हते. मात्र आता लवकरच याबाबत आदेश मिळणार आहे.

नाशिक शहरातील (Nashik city) महिला (Womens) आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यासाठी कायमच प्रयत्न सुरु असतात. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत असते.

महिलांना व्यवसायांसाठी प्रशिक्षण देण्याच्या ठेक्यावरून वाद सुरु असतांनाच आता महिलांसाठी राबविण्यात येणारी पिंक रिक्षांची योजना लवकरच सुरु होणार असल्याचे दिसत आहे. नाशिक महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना तीन चाकी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात येणार होती.

मागील काही दिवसांपासून करोनाची परिस्थीती असल्याने हा विषय प्रलंबितच राहिला होता. नाशिक शहरातील सहाही प्रभागांतून या रिक्षा प्रशिक्षणासाठी महिलांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 277 महिलांची निवड करण्यात आली आहे.

सुमारे 18 लाख रूपये खर्च करून महिलांना हे रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण विजय मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या (Vijay Motor Driving School) माध्यमातून प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती सभापती स्वाती भामरे (Swati Bhamre) यांनी माहिती दिली.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच आयुक्तांकडून हे प्रशिक्षण सुरु करण्यासाठी आदेश देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास भामरे (Vishwas Bhamre) यांनी दिली आहे.

प्रवासी महिलाच असणार

महिलांची रिक्षा पिंक रिक्षा राहणार त्या इतर रिक्षांपेक्षा वेगळे दिसणार आहे. कारण त्याचे चालक महिला राहणार आहे, तर रिक्षातील प्रवाशी देखील महिलाच राहणार आहे. यामुळे महिला हक्काने त्यात बसून प्रवास करू शकतील. नाशिकमध्ये ही योजना सुरू झाल्यावर इतर शहरांमध्येही अशा प्रकारची योजना सुरू होणार आहे

महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना आहेत. आता लवकरच पिंक रिक्षा योजना सुरू होणार आहे. यात महिलांना मनपाकडूप रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना परवाना, परमीटसह रिक्षा घेण्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे. यामुळे महिला आर्थिक सक्षम होणार आहेत.

– समिना मेमन, सदस्य, महिला व बाल कल्याण समिती.

- Advertisment -

ताज्या बातम्या