Friday, April 26, 2024
Homeनाशिकपिंपळगावात मतदानात कोरोनाच पळाला : कोरोना नियमांचा फज्जा

पिंपळगावात मतदानात कोरोनाच पळाला : कोरोना नियमांचा फज्जा

पिंपळगाव

निवडणूक आयोगाने कोरोनासंदर्भात तयार केलेल्या नियमांचा फज्जा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात उडाला. येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वच नियमांची पायमल्ली केल्यामुळे कोरोना संपला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

कोरोना असताना राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. मतदारांनी बुथवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी करावी. मतदारांनी मास्क वापरावा. सोशल डिस्टनिंगचे पालन करावे, कोरोनाग्रस्त किंवा क्वारांटाईन असणाऱ्या मतदारांनी शेवटच्या अर्ध्या तासात येऊन मतदान करावे, असे नियम मतदानासाठी करण्यात आले होते. परंतु पिंपळगावातील शास्त्रीनगर मतदान केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.

मतदारांसाठी सॅनेटाजर नव्हते. अनेक मतदारांनी मास्क घातला नव्हता. मतदारांची प्रचंड गर्दी झाली असतांना त्यावर नियंत्रण नव्हते.

ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांची हेळसांड होत होती. यामुळे या गावात कोरोना नाहीच का? हा प्रश्न सुज्ञ मतदार विचारत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या