तीर्थक्षेत्रांचा कायापालट करणार - मुख्यमंत्री शिंदे

पाथर्डी फाटा येथे जल्लोषात स्वागत
तीर्थक्षेत्रांचा कायापालट करणार - मुख्यमंत्री शिंदे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कुंभमेळ्यापूर्वी त्रंबकेश्वरसह नाशिक ( Trimbakeshwar & Nashik )मधील तीर्थक्षेत्रांचा आपल्याला आमूलाग्र बदल घडवायचा आहे.आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी पाथर्डी फाटा ( Pathardi Phata Nashik )येथे आयोजित स्वागत सोहळ्यात सांगितले.

नाशिक,मालेगाव, नांदगाव येथील प्रश्नांसाठी आढावा दौऱ्या प्रसंगी त्यांचे पाथर्डी फाटा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांवर पुष्पवृष्टी केली.यावेळी मयुरेश आढाव या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलाने काढलेली एकनाथ शिंदे यांची कॅनव्हस पेंटिंग त्यांना भेट दिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी कुठेही काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ह्या राज्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे. राज्यात शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळेल. कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा अनुभव या राज्याच्या विकासाला उपयोगी ठरेल. या राज्यात जो काही इतिहास घडला आहे तो तुम्ही पाहिला आहे.

आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका व विचार पुढे नेत आहोत. आता खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित अस जे काही स्वराज्याचे काम, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम करणार आहोत. हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच राज्य आहे. पंढरपूर ला गेलो असता १५ लाख वारकरी संप्रदाय तिथे होता आणि त्यांनी आपल्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले. पंढरपूर देखील तिरुपती बालाजी सारखे मोठे देवस्थान आपल्याला करायचे आहे.

यावेळी खासदार हेमंत गोडसे,आमदार सुहास कांदे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ,माजी सभागृह नेते बळीराम ठाकरे, योगेश म्हस्के,सुजित जीरापुरे,शिवम पाटील, मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे,डॉ. किरण वाघ, सचिन पाटील आदींसह शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com