Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याNashik Accident : पिकअपची झाडाला जोरदार धडक; तीन ठार, १३ जखमी

Nashik Accident : पिकअपची झाडाला जोरदार धडक; तीन ठार, १३ जखमी

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

गुजरातमधील डांग जिल्ह्यातील जोगबारी, नडगचोंड, कामत येथील मजूर गेल्या चार महिन्यांपासून नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) येथे काम करून घरी परताना हिरीडपाडा (ता. सुरगाणा) येथील वळणावर पिकअपचा (एमएच 41 एयु 5321) शनिवारी पहाटे तीन वाजता भीषण अपघात झाला. यात दोन महिला व एक बालकाचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत…

- Advertisement -

अर्चना विशाल म्हसे (20), मिना सोमा गुंबाड (30), रिहान विशाल म्हसे (8 महिने, सर्व रा. जोगबारी ता. अहवा) असे मृतांची नावे आहेत. मृतांचे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील द्राक्ष बागायतदार भाऊसाहेब बुंटे यांच्याकडे जवळपास चार ते पाच महिने काम केल्यानंतर द्राक्ष हंगाम संपल्याने मूळगावी जाण्यासाठी जोगबारी, कामात, नडगचोंड येथील मजूर रात्री बारा वाजता निघाले होते.

Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

पिकअप वाहनाचे हिरीडपाडा (ता. सुरगाणा) येथील वळणावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडाला पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर धडकले.

अपघातातील जखमींची नावे अशी :

राधा महेश पवार (20, कामत ता.अहवा), रत्ना किरण गुबांड (32), अमित्रा गणेश गुबांड (8), यशवंत शिवराम गुबांड (28), सोना नारायण गुबांड (38), किरण मोहन गुबांड (35), वैशाली धोंडू गांगुर्डे (9), धेंडू सोनीराम गांगुर्डे (22), संगिता धेंडू गांगुर्डे (30, हे सर्व राहणार जोगबारी ता.आहवा), संतोष राजू पवार (18), राहुल वसंत पवार (14), अरुणा राजू पवार (40), राजू सोमा पवार (49, हे सर्व राहणार नडगचोंड ता.वघई).

APMC Election Result : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ‘शेतकरी विकास’

जखमींना तत्काळ बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 9 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ही घटना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरगाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस नाईक पराग गोतरणे, चेतन बागुल उपस्थित होते.

APMC Election Result : लासलगाव बाजार समितीत थोरे गटाची सरशी

- Advertisment -

ताज्या बातम्या