Tuesday, April 23, 2024
HomeनंदुरबारPhotos # त्या आल्यात.... स्वत: नाचल्या, त्यांनाही नाचवले आणि वर्ल्ड बुकने...

Photos # त्या आल्यात…. स्वत: नाचल्या, त्यांनाही नाचवले आणि वर्ल्ड बुकने त्याची केली नोंद

नंदुरबार | प्रतिनिधी-

नंदुरबार येथे काल दि.२० नोव्हेंबर रोजी झालेल्या घुमर महोत्सवामध्ये (Ghumar festival) एकाचवेळी चार हजारावर महिला, (women) तरुणी थिरकल्या (staggered). या महोत्सवाची (Festival’s) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (World Book of Records (London, UK)) (लंडन, युके) मध्ये नोंद (Recorded) झाली आहे. या महोत्सवाला अभिनेत्री स्मिता जयकर, (Actress Smita Jaykar,) अभिनेत्री मानसी नाईक (Actress Mansi Naik,), अभिनेत्री सुप्रिया पठारे (Actress Supriya Pathare) यांच्यासह जिल्हयातील मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

नंदुरबार येथील काल दि.२० नोव्हेंबर रोजी घुमर महोत्सव पार पडला. या महोत्सवाला मराठी सिने अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेत्री सुप्रिया पठारे यांची विशेष उपस्थिती होती.

या महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे यात १३ ते ७० वयोगटातील सुमारे चार हजारावर महिलांनी एकाचवेळी नृत्य सादर केले. यात राजस्थानी घुमर नृत्य, लेझिम नृत्य असे सुमारे २५ मिनीटे नृत्य सादर केले. नंदुरबार येथील सर्व्हे नंबर २३० मधील नंदुरबार मसाला हाऊसजवळ झालेल्या या कार्यक्रमात व्यासपिठ उभारण्यात आले होते.

व्यासपिठासमोरील मैदानावर या सर्व महिला एकाचवेळी थिरकल्या. व्यासपिठावरुन दहा ते पंधरा नृत्य दिग्दर्शिकांच्या तालावर समोरील महिलांना नृत्य सादर केले. या नृत्यात अभिनेत्री मानसी नाईक, खा.डॉ.हीना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, महोत्सवाची संकल्पना असलेल्या पुणेस्थित प्रियांका माने, महोत्सवाच्या आयोजक सौ.राखी तवर, कुणाल वीर, लावणीसम्राट किरण कोरे हेदेखील या महोत्सवात थिरकले. त्यामुळे महोत्सव रंगतदार झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून, वाट माझी बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर, फू बाई फू फेम अभिनेत्री सुप्रिया पठारे, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा.डॉ.हीना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित,

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, सौ.रेखा चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र कळमकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुरुष लावणीसम्राट किरण कोरे यांनी ‘चंद्रा’ या लावणीवर अत्यंत बहारदार नृत्य करुन रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर मानसी नाईक यांनीदेखील एका गाण्यावर नृत्यावर सादर केले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. तसेच आदिवासी नृत्यही सादर करण्यात आले.

कार्यक्रमानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन, युके) चे व्हा.प्रेसिडेंट राजीव श्रीवास्तव यांनी महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या घुमर महोत्सवात चार हजारावर महिलांनी एकाचवेळी राजस्थानी घुमर नृत्य सादर केल्याने या महोत्सवाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे जाहीर केले. यावेळी प्रचंड आतीषबाजी करण्यात आली.

कार्यक्रमाची संकल्पना पुणे येथील कु.प्रियंका माने यांची होती. यावेळी डॉ.तेजल चौधरी, सौ.राखी तवर, लायन्स फेमिनाच्या सौ.शितल चौधरी, लायन्सचे अध्यक्ष सतीष चौधरी, हिना रघुवंशी, सुलभा महिरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या