पोरं पावसात अन् नेते छत्रीत...; नाशिकच्या राष्ट्रगायन कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

पोरं पावसात अन् नेते छत्रीत...; नाशिकच्या राष्ट्रगायन कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात सामूहिक राष्ट्रगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीदेखील हजेरी लावली होती...

कार्यक्रमात अचानक पाऊस (Rain) सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मात्र यावेळी स्टेजवर उभे असेलेले नेतेमंडळी मात्र छत्री उभे होते. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कार्यक्रमाचे टाकलेले फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

पोरं पावसात अन् नेते छत्रीत...; नाशिकच्या राष्ट्रगायन कार्यक्रमाचे फोटो व्हायरल
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

या फोटोत दिसून येते की, दानवे यांच्यासाठी एक व्यक्ती छत्री घेऊन उभा होता. तसेच स्टेजवरील इतर अधिकाऱ्यांनी देखील पावसात छत्रीचा सहारा घेतला. विद्यार्थी पावसात ओलेचिंब झाल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com