Photos # धुळ्यात खुनी गणपतीची खुनी मशिदीच्या मौलानांनी केली आरती

हिंदू - मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन
 Photos # धुळ्यात खुनी गणपतीची खुनी मशिदीच्या मौलानांनी केली आरती

धुळे : Dhule

शहरातील खुनी गणपतीची ( Khuni Ganpati ) मिरवणूक ( Visarjan Miravnuk) जुने धुळे भागातील खुनी मशिद येथे आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केले. खुनी मशिदीच्या ( Khooni Masjid Dhule ) मौलानांसह मुस्लिम बांधवांनी (Muslim brothers including Maulanas)गणरायाची आरती खुनी गणपतीचे स्वागत जल्लोषात स्वागत केले. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मानाचा खुनी गणपतीची मिरवणूक खुनी मशिदीजवळ येतो ती बरोबर अजान होण्याची वेळ असते. यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले आणि बंधुभावाचा संदेश (message of brotherhood) देण्यात आला.

मानाचा समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचे शिष्य थांबवते गुरुजी यांनी १८९४ मध्ये या गणपतीची स्थापना केली होती. १९०४ मध्ये या गणपतीची मिरवणूक निघाली त्यावेळी दोन धर्मांमध्ये वाद झाला होता. यावेळी काही जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे या गणपतीला खुनी गणपती तर या भागात असलेल्या मशिदीला खुनी मशीद म्हटले जाते.

मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक खुनी मशिदीजवळ आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com