Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto : पाणावलेले डोळे..दाटलेला हुंदका..गोड मानून घे लेकरांची सेवा..

Photo : पाणावलेले डोळे..दाटलेला हुंदका..गोड मानून घे लेकरांची सेवा..

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यासह शहरात लाडक्या गणरायाच्या विसर्जनाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गणोशोत्सव सुरु होता. आज भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे साश्रू नयनांनी निरोप देण्यात येत आहेत…

- Advertisement -

आज सकाळपासूनच महापालिका व पोलिसांचा यंत्रणा गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून शहरात ४३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत आहेत.

पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, कॉलेजरोड, गंगापूर रोड यांच्यासह शहरातील विविध ठिकाणी भाविक गणेश विसर्जन करीत आहेत. 27 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे उभारण्यात आली आहेत.

यंदाच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सहा विभागात टँक ऑन व्हीलची संकल्पना राबविण्यात आली आहे. याचा नागरिकांनी वापर करावा. असे आवाहन केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या