Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : सरकारी कार्यालयांत शुकशुकाट; विविध मागण्यांसाठी दोन दिवस संप

Photo Gallery : सरकारी कार्यालयांत शुकशुकाट; विविध मागण्यांसाठी दोन दिवस संप

मुंबई,नाशिक । प्रतिनिधी Mumbai/ Nashik

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे ( State Government Employees Union ) राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आजपासून दोन दिवसांच्या राज्यव्यापी संपावर गेले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला..

- Advertisement -

काय आहेत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाचा सविस्तर खालील लिंकवर

राज्य सेवक संपावर

नाशिक जिल्ह्यातून ( Nashik District )शासकीय वर्ग 3 व 4 कर्मचारी संपात उतरणार आहेत. संघटनेच्या वतीने प्रत्येक कार्यालयात द्वारसभा घेण्यात आल्या. महसूल विभाग, कोषागार कार्यालय, आदिवासी विकास भवन, धर्मदाय आयुक्त, आर.टी. ओ. कार्यालय, वस्तू व सेवा कर कार्यालय, वन विभाग, शिक्षण संचालनालय, फॉरेन्सिकलॅब, जलसंपदा विभाग, सिव्हील हॉस्पिटल, इ.एस.आय.हॉस्पिटल सातपूर, महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड, आदी सर्व नाशिक जिल्ह्याच्या कार्यालयातील शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 100% टक्के संपात सहभागी झाले असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा सुनंदा जरांडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या