भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन, व्हाया जळगाव कलेक्टर, काय आहे प्रकरण?
Breaking News

भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन, व्हाया जळगाव कलेक्टर, काय आहे प्रकरण?

नाशिक | Nashik

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (BHR) प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनिल झंवर यांचा मुलास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, (chhagan bhujbal ) पंकज भुजबळ (pankaj bhujbal )यांच्या नावाने फोन करण्यात आला. ‘तुम्ही माझे एक काम करुन द्या, मी तुमचे काम करुन देतो’ असे सांगत फसवणूक केली. या प्रकरणात चक्क जळगाव जिल्हाधिकारींचे (collector)नाव वापरले. अखेरी या प्रकरणाची चौकशी करुन महाराष्ट्र शासनाची (maharashtra government)फसवणूक केल्याचा गुन्हा नाशिकच्या (nashik)अंबड पोलिसात दाखल करण्यात आला....

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (BHR) प्रकरणात जळगाव येथील सुनिल झंवर यांच्यावर डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सुनिल झंवर यांना ७ सप्टेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. सुनिल झंवर यांचा मुलगा सुरज झंवर उच्च न्यायालयात कामानिमित्त आले असतांना ९४२३४२११११ या क्रमांकावरुन फोन आला.

मी पंकज भुजबळ बोलत असून तुम्ही ८ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मला येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन पंकज भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगत अजून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँण्डलाइन क्रमांकावरुन फोन करत ‘मी अभिजित राऊत (जळगाव कलेक्टर)बोलतोय...तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला.

सुरज झंवर यांनी या प्रकारानंतर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या लँण्डलाईनवर नाशिकवरुन पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकारींच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या मोबाइल पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला. त्यांनी लँण्डलाइनवरुन फोन करण्यास सांगितले.

हा विषय कोणाला सांगू नका...

सुरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँण्डलाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ असल्याची बतावनी करत, माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नाही, असे वचन देण्याचे सांगत, तुम्ही माझे एक काम करुन द्या, मी तुमचे एक काम करुन देतो, अशी ऑफर दिली. तुम्हाला समीर व पंकज भुजबळही मदत करतील आणि संपर्कात राहतील, असे सांगत फोन बंद केला.

चौकशी करुन गुन्हा दाखल

मोबाईलवर आलेले ऑडिओ क्लिप नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकवल्या. तो आवाज त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरण नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करत पालकमंत्री छगन भुजबळ, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पंकज भुजबळ यांचा नावाचा वापर करत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.