Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'या' कारणाने आज पेट्रोल खरेदी बंद

‘या’ कारणाने आज पेट्रोल खरेदी बंद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन (Federation of All India Petrol Dealers Association) (फामपेडा) यांच्या विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंपचालकांनी (Petrol pump operators) आज देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन (agitation) पुकारले आहे.

- Advertisement -

आज मंगळवारी (ता. 31) होणार्‍या या आंदोलनात राज्यातील 6 हजार 500 तर नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सुमारे 450 पेट्रोलपंप चालक सहभागी होणार आहेत. आजच्याच दिवशी पेट्रोलपंप (Petrol pump) चालकांकडून इंधन खरेदी केली जाणार नाही. ग्राहकांच्या सुविधेकरिता पंपावर साठा उपलब्ध असेपर्यंत त्यांची विक्री जाणार असल्याचे संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन (Federation of All India Petrol Dealers Association) (फामपेडा) यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. शासनाने 16 जून 2017 ला सुरू केलेली डेली प्राइस चेंज (Daily price change) पद्धत अचानक बदलून स्वतःला व ऑइल कंपन्यांना (Oil companies) सोयीच्या घोषणा करताना डिलर्सचे नुकसान होणार नाही, याचा विचार केलेला नाही.ऑइल कंपन्या याबाबतच्या समस्यांचे निराकरणांसाठी चर्चेस तयार नाहीत. यासाठी मंगळवारी (ता.31) एक दिवस खरेदी बंद ठेवून केंद्र शासन (central government) व ऑइल कंपन्या यांचे लक्ष्य वेधून एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेले आहे.

या आहेत मागण्या :

2017 पासून पेट्रोल डिलर्सचे डिलरचे मार्जिन सुधारलेले नाही. शासन व ऑइल कंपन्यासोबत झालेल्या करारानुसार दर सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाशी (All India Consumer Price Index) निगडित केले असून, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. 2017 पासून आजपर्यंत इंधनाच्या किंमती मात्र दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक खर्च बँकांचे व्याज पगार, वीजबिले, बाष्पीभवन विविध शासकीय फ्रीज आदी खर्चही दुप्पट झाले आहेत. त्यातच दोन वेळा केंद्राने उत्पादन शुल्कात कपात जाहीर केली व इंधनाच्या किंमती सुमारे 8 ते 12 रुपये कमी केल्या.

त्याची अंमलबजावणी ताबडतोब करायला लावली. प्रत्यक्षात विक्रेत्यांनी जास्त दराने कर भरून माल खरेदी केला होता. विक्री करताना त्याला कमी केलेल्या दराने विक्री करायला बंधनकारक केले. यामुळे देशभरात सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान व्यावसायिकांचे झाले. डायनमिक प्रायसिंग कंपनीकडून पाळली जात नसल्याने पूर्वीची 15 दिवसांनी दर बदलायची पद्धत सुरू करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या