Saturday, May 11, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल उच्चांकावर

नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल उच्चांकावर

नाशिक :

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा वाढ झाली. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने आतापर्यंतच्या उच्चांकावर इंधन पोहचले आहे. पेट्रोलची वाटचाल ९० नंतर आता शंभरीकडे जाणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये गुरुवारी पेट्रोल ९१.२६ तर डिझेल ८०.२६ वर पोहचले. सलग २९ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर बुधवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. डिझेलमध्ये २८ पैसे तर पेट्रोलमध्ये २४ पैशांनी गुरुवारी वाढ झाली.

दरम्यान, ८ डिसेंबरपासून इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र, वर्षाच्या पहिल्या महिन्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज आवश्यक असणार्‍या बर्‍याच गोष्टींवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर लक्ष ठेवून असतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लंडनमध्ये ब्रेंट क्रूडचा दर ५३.८९ डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर अमेरिकी WTI क्रूडचा दर प्रति बॅरल५० डॉलर पेक्षाही जास्त आहे. देशांतर्गत बाजारात गेल्यावर्षी दुसऱ्या सहामाहीत पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजी कायम होती. यानंतर अनेकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी-जास्त होत होत्या. मात्र, 8 डिसेंबरपासून दर स्थिर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या