तज्ज्ञ म्हणतात, पेट्रोल 125 पर्यंत जाणार ? का जाणून घ्या

OPEC+ची 1 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष
तज्ज्ञ म्हणतात, पेट्रोल 125 पर्यंत जाणार ? का जाणून घ्या
पेट्रोल

नवी दिल्ली : New Delhi

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोल 105 वर पोहचले असून डिझेलची वाटचाल शंभरीकडे जात आहे. दुसरीकडे जागतिक क्रूड तेलाच्या (crude oil prices) किंमती नियंत्रणाबाहेर असल्याने आपण काहीही करु शकत नाही असे सांगत सरकारने आपले हात वर केले आहे. आपल्याकडे पेट्रोल व्यतीरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही का? भविष्यकाळात दर कमी होण्याची काही शक्यता नाही का? यावर सर्व ब्रोकरेज हाउस आणि तज्ज्ञांचे मत आहे की, नाही कच्चे तेल स्वस्त होणार नाही.

पेट्रोल
मुकेश अंबानींची घोषणा : रिलायन्स, गुगलसोबत मिळून लॉन्च करणार ‘जिओफोन नेक्स्ट’

गेल्या एका वर्षात ब्रेंट क्रूड 26 डॉलर प्रति बॅरलपर्यंत महागला आहे. जून 2020 मध्ये कच्चा तेल प्रति बॅरल 40 डॉलरच्या किंमतीवर होते आणि आज ते प्रति बॅरल 76 डॉलरवर बाजारात आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीं या चिंतेचा विषय आहे. सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर (crude oil prices) ठरत असल्याचे सांगत आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे. आता सर्वांच्या नजरा 1 जुलैला होणाऱ्या ओपेक OPEC+ देशांच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यामध्ये उत्पादन धोरणावर निर्णय होणार आहे. रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे.

125 रुपयांपर्यंत पेट्रोल दर पोहोचणार?

जर OPEC+ देशांच्या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतात लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, याचा दबाव सरकारवर आहे. सध्याच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लिटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तेल तज्ज्ञ अरविंद मिश्रा यांचे म्हणणे आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सतत घसरण असल्याने महसूल दबाव आहे, त्यात सरकार लसीकरण मोहीमही राबवित आहे, अशा परिस्थितीत सरकार तेलाच्या किंमती कमी करतील अशी आशा कमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमती जूनपासून वाढायला सुरवात झाली आहे. बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की, सन 2022 पर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहचेल.

महसूलात घट, पेट्रोल स्वस्त अशक्य

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम सर्वांवर होतो. त्यातच महसूल घटल्यामुळे सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. परिणामी पेट्रोलचे दर वाढणार असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

इराण आणि अमेरिका वाद

इराणवर अमेरिकेने लादलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत राहतात. जर इराण आणि अमेरिका यांच्यात अणू कराराबाबत काही सहमती झाली, तर अमेरिका इराणवरील बंधनं कमी करु शकते. त्यामुळे इराणकडून इंधनाचा पुरवठा वाढवला जाऊ शकतो. मात्र दोन्ही देशांकडून याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com