आज पेट्रोल-डिझेलचे ‘जैसे थे’, पण CNG पुन्हा महागला; जाणून घ्या आजचे दर

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) धडाका सुरू आहे. या इंधन दरवाढीने जनतेची होरपळ सुरू झाली आहे. मात्र सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. पण पुण्यात आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ (CNG price hike) झाली आहे.

‘श्रुती हसन’चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

पुण्यात आज सीएनजीच्या दरात २ रुपये २० पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर ७७ रुपये २० पैसे प्रति किलो इतका झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता सीएनजीच्या दराने ८० चा आकडा पार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

दरम्यान सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती.

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

त्यानुसार १ एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे ६ रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र हा दिलासा फक्त काही दिवसांसाठीच होता.

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी, ‘इतक्या’ कोटीचे रक्कम आणि दागिने लंपास’शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *