पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

केंद्र सरकारची उत्पादन शुल्कात कपात
पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात Petrol, diesel rate सातत्याने वाढ होत असताना मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात Reduce in Petrol & Diesel Prices केली आहे.

उद्या गुरुवारी सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने Union Ministry of Finance राज्यांनादेखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जोरदार झटका बसल्याने मोदी सरकारने हा तातडीने निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज 35 पैशांनी महाग होत आहे. 4 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी आठ रुपयांनी वाढ झाली आहे.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते. जे संपूर्ण भारतात एकसमान आहे. मात्र यावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांनादेखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने 100 रुपयांचा पल्ला गाठला आहे. काही शहरात तर पेट्रोलने 110 रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com