Petrol Disel Price : आज पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचे दर

Petrol Disel Price : आज पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ काहीसी स्थिरावली आहे. आज (२७ मे) पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाच्या दरांत कोणतीही वाढ अथवा कपात केलेली नाही. त्यामुळे इंधन दरवाढीला एक दिवसाचा ब्रेक लागला आहे. यापुर्वी मंगळवारी पेट्रोल २३ तर डिझेल ४४ पैश्यांनी महागले होते.

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर ९३.४४ आणि डिझेल ८४.३२ रुपये इतके आहेत. तर, मुंबई त हे दर ९९.७१ रुपये पेट्रोल आणि ९१.५७ रुपये डिझेल इतक्यावर स्थिर आहेत. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ९३.४९ आणि डिझेलसाठी प्रती लीटरमागे ८७.१९ रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.०६ रुपये आणि डिझेल ८९.११ रुपयांना विकलं जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com