Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर

निवडणुका संपल्यानंतर मे महिन्यात १० वेळा दरवाढ
Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर

नाशिक :

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या. आता नाशिकमध्ये पेट्रोल १०० पेक्षा ४२ पैसे दूर आहेत. आज पेट्रोल २६ पैसे तर डिझेल ३० पैसे वाढले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती All Time High म्हणजेच महागाईच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.

Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर
आता १०० रुपयांतच होणार कोरोना चाचणी

निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ केली जाते. २ मे रोजी पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल लागला. त्यानंतर ४ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग चार दिवस वाढविण्यात आल्या आहेत तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निवडणुकांमुळे पहिले १८ दिवस काही प्रमाणात स्थिर होत्या. मेमध्ये पेट्रोल आणि डिझेल १० वेळा महाग झाले आहेत.

राज्यात परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल १००.७५ पैसे तसेच डिझेलही ९०.६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

जाणून घ्या कुठे काय आहे दर

शहर पेट्रोल डिझेल

नाशिक ९९.५८ ८९.७५

जळगाव ९९.४९ ९०.१९

नगर ९८.८६ ८९.०६

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com