वाढता वाढता वाढे..! पेट्रोल, डिझेल आजही महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

वाढता वाढता वाढे..! पेट्रोल, डिझेल आजही महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

दिल्ली | Delhi

देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडूनही पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. आता निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांचा भडका वाढला आहे.

देशात आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा ५७ पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर ५२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. मागील ६ दिवसांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३.७० रुपयांनी तर डिझेलचे दर ३.७५ रुपयांनी वाढले आहेत.. (Petrol Diesel price hike News)

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११३.३५ रुपये, तर डिझेल ९७.५५ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९८.६१ रुपयांवर पोहोचले असून डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०४.४३ रुपयांवर पोहोचले असून डिझेल ९४.४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच परभणीत देशातील सर्वाधिक दर आहेत. परभणीत पेट्रोल११६.५६ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल ९९.२६ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

Related Stories

No stories found.