पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचा दर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच शतक
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचा दर

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे २४ आणि २९ पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रति लीटरच्या दरांमध्ये झाली. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मे महिन्यात आतापर्यंत एकूण १५ दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा ३.३४ रुपये तर डिझेलचा दर हा ३.८६ रुपये प्रतिलीटरने वाढला आहे.

आज दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.७२ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.६१ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.३९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.४६ रुपये प्रती लीटर झाले आहे.

तसेच महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामध्ये अमरावती १००.४९, औरंगाबाद १००.९५, भंडारा १००.२२, बुलडाणा १००.२९, गोंदिया १००.९४, हिंगोली १००.६९, जळगाव १००.८६, जालना १००.९८, नंदूरबार १००.४५, उस्मानाबाद १००.१५, रत्नागिरी १००.५३, सातारा १००.१२, सोलापूर १००.१०, वर्धा १००, वाशिम १००.३४, या जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाली आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com