दिल्ली l Delhi

मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने कच्चा तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. इंधन दरवाढीचे सत्र कायम असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नवनवा उच्चांक गाठत आहेत.

देशात आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत २६ पैशांनी तर, डिझेलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झाली आहे. तसेच अनेक शहरात पेट्रोलच्या किंमतीने ९० रुपायांचा आकडा ओलांडला आहे. लवकरच हा आकडा शंभर ओलांडण्याची शक्यता आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोल ८७.८५ रुपये आणि डिझेल ७८.०३ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल ९४.३६ रुपये आणि डिझेल ८४.९४ रुपये प्रति लीटर आहे.

नागपूरमध्ये पेट्रोल ९४.३३ रुपये आणि डिझेल ८४.९१ रुपये प्रति लीटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल ९३.६५ रुपये आणि डिझेल ८२.९२ रुपये प्रति लीटर आहे.

पुण्यामध्ये पेट्रोल ९३.५४ रुपये आणि डिझेल ८२.८१ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल ८९.१६ रुपये आणि डिझेल ८१.६१ रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नईत पेट्रोल ९०.८१ रुपये आणि डिझेल ८३.१८ रुपये प्रति लीटर आहे.

बेंगळुरूत पेट्रोल ९०.७८ रुपये आणि डिझेल ८२.७२ रुपये प्रति लीटर आहे.

नोएडात पेट्रोल ८६.८३ रुपये आणि डिझेल ७८.४५ रुपये प्रति लीटर आहे.

चंडीगढमध्ये पेट्रोल ८४.५५ रुपये आणि डिझेल ७७.७४ रुपये प्रति लीटर आहे.

पटनात पेट्रोल ९०.२७ रुपये आणि डिझेल ८३.२२ रुपये प्रति लीटर आहे.

लखनऊमध्ये पेट्रोल 86.77 रुपये आणि डिझेल 78.39 रुपये प्रति लीटर आहे.

यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत प्रति बॅरल ६० डॉलरच्या पुढे गेली आहे, जी मागील वर्षातील सर्वाधिक आहे. तेल कंपन्या या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करते. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.