मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; पेट्रोल ५ तर डीझेल ३ रुपयांनी स्वस्त

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात पेट्रोल ५ रुपये तर डीझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे. लवकरच पेट्रोल डीजेलवरील कर कपात केली जाईल असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते. त्यानुसार कॅबिनेटची बैठक झाली; यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत इंधनावरील करकपातीची घोषणा केली….

आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक झाली. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी तीन मोठ्या घोषणा नव्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या.

यात पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यातही राबविले जाणार आहे.

तसेच काल (दि १३) केंद्र सरकारने बुस्टर डोस मोफत दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हे अभियान महाराष्ट्रात सरसकट राबविले जाणार असून पुढील काळात करोना हद्दपारीसाठी बुस्टर डोसची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केली.

आज मध्यरात्री १२ वाजेपासून सरसकट इंधन दरात सुट मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एका माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाचे ते उत्तर देत होते. त्यामुळे उद्यापासून नागरिकांना पेट्रोल आणि डीझेल कमी दरात मिळण्यास सुरुवात होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *