Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | Mumbai

शिवसेना शिंदे गट आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दीपक केसरकरांचे शरद पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

मोठी दुर्घटना! आरती दरम्यान मंदिराच्या सभामंडपावर कोसळलं झाड, ७ जणांचा मृत्यू

हे प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे आपला निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गट पक्षाचा निधी आणि कार्यालयावरही दावा करू शकतात, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. परंतु, निवडणूक आयोगच्या निर्णायावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच, याप्रकरणी 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

- Advertisment -

ताज्या बातम्या