Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापेठमधील 'त्या' खुनाचा उलगडा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

पेठमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पेठ येथे सापडलेल्या मृतदेहाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. सचिन उर्फ काळु दुसाने (रा. गणेश नगर, निफाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिनच्या पत्नीसह, तिचा प्रियकर व खुनात मदत करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

आरोपींनी सर्वच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तरी योग्य मार्गदर्शन आणि डिटेक्शनच्या जोरावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पेठ पोलीस यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या प्रकरणात एका महिला आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह गुजरात मधील आहे की नाशिक मधील येथून हा तपस सुरू होता. मयत व्यक्तीच्या अंगावर कपडे, एक।बूट आणि अंगावर राम नाव गोंदलेलं होत. याव्यतिरिक्त कोणताही खून नव्हती.

प्राथमिक तपासात समोर आल्यानुसार, या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह फेकून दिल्याचे पोलिसांच्या समोर आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासास सुरुवात केली. दोन दिवसांनी निफाड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती.

हीच माहिती लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने सूत्रे फिरवली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, सआयक पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, संजय गोसावी, हनुमंत महाले प्रभाकर पवार, अंमलदार नितीन मंडलिक आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी संशयित दत्तात्रय यास ताब्यात घेत चौकशी केली असता सुरुवातीस त्याने टाळाटाळ केली. मात्र सखोल चौकशीत त्याने सचिन दुसाने यांचा खून केल्याची कबुली दिली. दत्तात्रय याचे शोभा दुसाने हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. २२ जानेवारीला सचिनच्या घरातच सचिनला बेदम मारहाण करून जीवे मारले.

यासाठी महाजन याने सचिनची पत्नी शोभा हिच्यासह नाशिक येथील डोसा विक्रेता संदिप किट्टू स्वामी (३८, सिडको), अशोक मोहन काळे ३०, रा. दत्त नगर, चिंचोळे) यांनी मदत केली. खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यारे, मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांना रिक्षा चालक गोरख नामदेव जगताप (४८, राणा प्रताप चौक, सिडको नाशिक) व पिंटु मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड) यांनी मदत केल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. मयत सचिन हा इतर व्यवसायांसोबत गाड्या खरेदी विक्रीचा देखील व्यवसाय करत असल्याने ती कार देखील संशयितांनी नष्ट केली होती. सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली व सचिनने विक्री करण्यासाठी आणलेली एमएच. ४३ एडब्ल्यू १३०८ क्रमांकाची कारही पोलिसांनि जप्त केली आहे.

ही कार संशयित आरोपी संदिप किटटू स्वामी याने अंबड आयटीआय लिंक रोडवरील भंगार व्यवसायीक मुकरम जहिर अहेमद शहा (२६) यास विक्री केली होती. मुकरम याने कार तोडण्यास सुरुवात केली होती मात्र पोलिसांनी ती जप्त करीत मुकरम यासही अटक केली आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडन 3 कार, 6 मोबाईल व एक लाखाची रोकड हस्तगत केली आहे. चौकट पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांच्यावर मोक्का लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या