शहरात ड्रोन उडविण्यासाठी लागणार परवानगी

शहरात ड्रोन उडविण्यासाठी लागणार परवानगी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात आता ड्रोन कॅमेरा ( Drone- Camera )उडविण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच आता पोलीस आयुक्तालय हद्दीतील १६ संवेदनशील ठिकाणे नो ड्रोन फ्लाय झोन (No drone fly zone ) म्हणून जाहीर करण्यार आलेले आहेत. याबाबतचे अआदेश आज शहर पोलिसांनी आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naikanavre) यांच्या सहिनीशी प्रसिद्धी केले आहे.

दरम्यान, बंदी काळात काही कार्यक्रमासाठी छायाचित्रण करायचे असेल, तर अपेक्षित कागदपत्रे सादर करून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असेही पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

नो ड्रोन फ्लाय झोन

नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत स्कूल ऑफ आर्टिलरी, इंडिया प्रेस, करन्सी नोट प्रेस, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, शासकीय मुद्रणालय, श्री काळाराम मंदिर, एअर फोर्स स्टेशन, आर्मी स्कूल, मध्यवर्ती कारागृह, पोलीस प्रशिक्षण केंद्र यासह महत्वाच्या संस्था आहेत. त्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्यांची सुरक्षा अबाधित रहावी यासाठी 'नो ड्रोन फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com