सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा

आवश्यक कारणाशिवाय खासगी वाहनाने प्रवास करण्यास मनाई
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई | प्रतिनिधी

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांना वैध कारणासाठी लोकलने प्रवास करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

याशिवाय राज्यातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक अर्थात बस, रेल्वेद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल. मात्र, कोणत्याही योग्य आणि आवश्यक कारणाशिवाय नागरिकांनी खासगी वाहनाने प्रवास करू नये, असे सरकारने म्हटले आहे.

राज्य सरकारने १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांवरून नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये म्हणून राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' च्या आदेशात स्पष्टता दिली आहे. शिवाय केवळ निर्बंध टाकायचे म्हणून टाकलेले नाहीत. तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा अन्यथा या सवलतीवर देखील निर्बंध आणावे लागतील, असा इशारा सरकारने दिला आहे.

राज्यातील वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने बंद राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू गटातील दुकानच उघडी राहू शकतील. बांधकाम साहित्याची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही. नागरिकांना सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरु राहिल. प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना स्थानिक प्रशासनाची मान्यता घ्यावी लागेल. वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येणार नाही. स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने बंद राहणार आहेत.

१९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा आयोजित करण्याविषयी संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल. विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या आधारे ये-जा करता येईल. तसेच प्रौढ व्यक्ती बरोबर असेल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com