आंध्र,कर्नाटकच्या कांदा निर्यातीला परवानगी

महाराष्ट्राला केंद्राचा ठेंगा
Onion
Onionकांदा प्रश्न आज कॅबिनेटमध्ये मांडणार

लासलगांव । वार्ताहर Lasalgaon

कृष्णापुरम आणि बेंगलोर रोझ या कांद्यास निर्यातीसाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांनी दिली.

आज या संदर्भात नोटिफिकेशन काढून कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे.दरम्यान,महाराष्ट्रातील कांद्याला जगभरात मागणी असताना केंद्र सरकारकडून निर्यातीला परवानगी न देता शेतकर्‍यांवर अन्याय केला असल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.

वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्राने आज नोटिफिकेशन काढून कृष्णापुरम आणि बेंगलोर रोझ या कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी दिली आहे. एका विशिष्ट राज्यातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे.

चेन्नई पोर्ट वरून या कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यासाठी कांदा निर्यातदार यांना फलोत्पादन आयुक्त कर्नाटक यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. 31 मार्च 2021 पर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.

शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने संपूर्ण कांदा निर्यातीला परवानगी देणे गरजेचे होते. मात्र फक्त दोन राज्याच्या कांद्याला परवानगी देऊन दुटप्पी भूमिका सरकार का घेत आहे ? केंद्र सरकारने शेतकर्‍यामध्ये हा भेदभाव केला असून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर अन्याय आहे.

-जयदत्त होळकर, संचालक मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com