कोरोना संकट : आता घरातही मास्क घालण्याची वेळ आलीय - केंद्र सरकार

कोरोना संकट : आता घरातही मास्क घालण्याची वेळ आलीय - केंद्र सरकार
मास्क

नवी दिल्ली:

देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जण बेजार झाले आहे. रुग्णालये भरली आहे. बेड मिळत नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. केंद्र सरकारने कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी घराही मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.

Title Name
कोरोनाचे संकट : गुगल, मायक्रोसॉफ्टने भारतासाठी केली ही घोषणा
मास्क

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, कोरोनाची लक्षणे दिसताच स्वत:ला तत्काळ आइसोलेट करा. कोरोना चाचणीचा अहवाल येण्याची वाट पाहू नका. आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. परंतु लक्षणे दिसताच स्वत:ला संक्रमित समजून कोरोनाची गाइडलाइन फॉलो करा.

Title Name
मोफत लसीच्या घोषणेवरुन महाविकास आघाडीत धुसफूस
मास्क

आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मास्क यांनी मास्क न घातल्यामुळे वाढत असलेल्या धोक्याची माहिती दिली. जर दोन जण मास्क घालत नसतील व सोशल डिस्टसिंगचे पालन करत नसतील तर कोरोना होण्याचा धोका ९० टक्के वाढतो. पण जर मास्क वापरला व गाइडलाइनचे पालन केल्यास हा धोका ३० टक्के कमी होतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com