New Year 2023! नवं वर्षाचे पहिले स्वागत ऑकलँडमध्ये... पाहा VIDEO

New Year 2023! नवं वर्षाचे पहिले स्वागत ऑकलँडमध्ये... पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

आज जगभरात २०२२ वर्षाचा शेवटचा दिवस असून भारतात काही तासांनंतर नवीन वर्ष २०२३ ला सुरूवात होणार आहे. दरम्यान, भारताच्या आधी न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

न्यूझीलंडनमधील महत्त्वाचं शहर असलेल्या ऑकलंडच्या स्काय टॉवरवर डोळ्याचे पारणे फेडणारी रोषणाई आणि आकर्षक आतिषबाजी करून नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता. सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षाचं स्वागत करण्याची संधी साधण्यासाठी जगभरातून पर्यटक न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत.

भारतातही विविध शहरांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. विशेषत: मुंबई, कोकण, गोवा आणि इतर पर्यटन स्थळांवर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com