१५ जुलैपासून करोना लसीकरणाची महामोहीम!

१८ वर्षावरील नागरिकांना 'बुस्टर डोस' मोफत मिळणार
१५ जुलैपासून करोना लसीकरणाची महामोहीम!

दिल्ली l Delhi

देशात करोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

येत्या १५ जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक विशेष अभियान घेण्यात येणार आहे.

या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com