Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापेन्शनर्स डे विशेष : निवृत्तांची आरामात जगण्याची मानसिकता कालबाह्य

पेन्शनर्स डे विशेष : निवृत्तांची आरामात जगण्याची मानसिकता कालबाह्य

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

आयुष्यभर कुटुंबासाठी नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतर Retirement या व्यक्तीला फारसे श्रम न करता कुणाचाही आधार मिळाला नाही तरी सुखकर जीवन जगता यावे यासाठी पेन्शनची योजना देशात असली तरी स्वत:ला कुठेतरी गुंतवून ठेवण्याची मानसिकता mentality पेन्शनर्सची वाढत आहे. त्यामुळेच निवृत्तांना आता शासन पातळीवरही मानधनावर घेऊन काम भागवून घेण्यास सुरवात झाली आहे.

- Advertisement -

धकाधकीच्या काळात जीवनशैली बदलत चालली आहे. नोकरीत 30ते 40 वर्षे सेवा बजावल्यानंतर अचानक घरी स्वस्थ बसून राहणे अनेकांना अवघड होते. पेन्शनच्या रकमेतून खर्च भागवत उर्वरीत आयुष्य कुटुंब, नातवंडांसमवेत आरामात घालवायचे, अशी एकेकाळची मानसिकता आता बदलत चालली आहे.

शहरातील पेन्शनर मंडळींकडून विविध क्लब, संघटना किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमात स्वत:ला व्यस्त ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात 100 ज्येष्ठ नागरिक संंघात त्यांचा समावेश झाला आहे. कुटुंंबातील सदस्यांचा संवाद कमी होत चालल्याने आपण निरुपयोगी न राहता समाजासाठी काही करत आयुष्य सार्थकी लावण्यासाठी पेन्शनर समाजासाठी हातभार लावण्याचे काम करत आहे.

पेन्शनचा इतिहास दीडशे वर्षाचा

पेन्शनचा इतिहास 150 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र लढ्यानंतर ब्रिटिशांनी हिंदुस्थानात पेन्शन देण्यास सुरुवात केली. 1871 मध्ये इंडियन पेन्शन अ‍ॅक्ट पारित केला. परंतु पेन्शन देणे अथवा न देणे हे गव्हर्नर व व्हाईस गव्हर्नर यांच्यावर अवलंबून होते. संरक्षण खात्यातील अर्थसल्लागार डी एस नाकर निवृत्ती वेतनासाठी न्यायालयात गेले. त्यांच्या याचिकेवर 17 डिसेंबर 1883 रोजी निकाल देताना पेन्शन भीक नसून त्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने सांगितले व शासनाला पेन्शन देणे बंधनकारक केले. त्यानंतर 17 डिसेंबर हा पेन्शनर दिन म्हणून साजरा केला जातो, असे नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे उपाध्यक्ष रविंद्र थेटे यांनी सांगितले.

कर्मचारी भुषण प्रेरणा पुरस्काराचे आज वितरण

नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनतर्फे आज सकाळी 11 वाजता पेन्शनर्स एकात्मता दिन आणि जागतिक पेन्शनर्स दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. स्व.माधवराव भणगे, स्व.गमनराव देवरे यांच्या स्मरणार्थ कर्मचारी भुषण प्रेरणा पुरस्काराने बापूसाहेब कुलकर्णी, बापूसाहेब भामरे, विलास गांगुर्डे, पी.एस.देव्हारे, पुजा पवार, रविंद्र परदेशी, डॉ. कपिल आहेर, भास्कराव सोनवणे, सोमनाथ सहान, सुनिल माधवराव भणगे, आशिष गमनराव देवरे यांंना सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या