Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशअन् Paytm चे CEO विजय शेखर मंचावरच रडू लागले

अन् Paytm चे CEO विजय शेखर मंचावरच रडू लागले

उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून आलेल्या युवकाच्या खिशात केवळ १० हजार रुपये असताना ११ वर्षांपूर्वी त्याने व्यवसाय सुरु केला होता. आज याच व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे.

हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

- Advertisement -

हा उद्योग म्हणजे पेटीएम (Paytm). ही पेटीएम उभारणाऱ्या विजय शेखर शर्मांसाठी ( Vijay Shekhar Sharma) आजचा दिवस खूप खास होता.शेखर यांनी केवळ १० हजार रुपयांत त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. त्यांना इंग्रजीही बोलता येत नव्हती. पेटीएम लिस्टिंग समारंभात जेव्हा राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा ४३ वर्षीय शेखर भावूक झाले.

नाशिकवरुन जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत बैठक

शेखर शर्मा का भावूक झाले

विजय शेखर शर्मा आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भावूक झाले होते. डोळ्यातील अश्रू पुसत ते म्हणाले, “जेव्हाही राष्ट्रगीत वाजते, तेव्हा त्याची एक ओळ भारत भाग्य विधाता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येते. आज माझ्या बाबतीतही तेच झालं. ‘भारत भाग्य विधाता’ हा शब्द माझ्या आयुष्याशी अशा प्रकारे का जोडला गेला आहे की, माझ्या डोळ्यात पाणी का येते ते मला कळत नाही. आज असा दिवस आहे ज्या दिवशी माझ्यासोबत तरुण भारताची स्वप्ने पूर्ण होत आहेत. आम्ही देशातील सर्वात मोठा आयपीओ असू याची कल्पनाही कोणी केली नव्हती, पण आज ते घडले आहे. लोक म्हणायचे की तुम्ही एवढ्या महागड्या किमतीत पैसे कसे उभे करणार, म्हणून मी म्हणायचो की, आम्ही भाव मिळण्यासाठी नाही तर काही उद्देशाने पैसे उभे करत आहोत. मी लाखो गुंतवणूकदारांना पेटीएमच्या प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.

भारतातील सर्वात मोठा IPO

उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आणि एका शाळेतील शिक्षकाचा मुलगा असलेला विजय आज फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. शालेय शिक्षण हिंदी माध्यमामधून झाले. अशा परिस्थितीत पेटीएम सारखी दिग्गज फिनटेक कंपनी स्थापन करणे, तिला उंचीवर नेणे आणि त्यासाठी देशातील सर्वात मोठा IPO आणणे सोपे काम नाही. कंपनीने विक्रमी १८,३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) आणला. परंतु हा भारतातील सर्वात मोठा IPO असल्याचे सिद्ध झाले आहे. लिस्टींगच्या पहिल्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल २६ टक्क्यांनी पडली. यामुळे लहान-मोठ्या सर्वच गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या