थकबाकी भरा अन्यथा...; 'त्या' गाळेधारकांना मनपाचा इशारा

थकबाकी भरा अन्यथा...; 'त्या' गाळेधारकांना मनपाचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेचे (Municipal Corporation) शहर व उपनगरात ६२ व्यापारी संकुल (Business Complex) असून त्यातील गाळे (shops) धारकांनी रेडीरेकनर दरानूसार ५५ कोटींचे भाडे थकवले आहे.

महापालिका कर संकलन विभागाने (Municipal Tax Collection Department) दीड हजार गाळेधारकांना नोटीस (notice) बजावली असून नोव्हेंबरएंडपर्यंत थकबाकी भरा अन्यथा डिसेंबरपासून गाळे सील (Seal) केले जातील, असा इशारा दिला आहे.

त्यामुळे गाळेधारकांमध्ये चलबिचल वाढली असून जवळपास पावणे दोन कोटी रुपये थकबाकी (arrears) जमा झाल्याची महिती मिळली आहे. महापालिकेचे सहा विभागातील व्यापारी संकुलात एकूण दोन हजार ९३ गाळे आहे. तर अोट्याची संख्या ८५१ इतकी आहे. त्यातून दर महिन्याला मिळणारे भाडे महापालिकेच्या उत्पन्नाला हातभार लावते.

सन २०१४ मध्ये महापालिका प्रशासनाने (Municipal administration) रेडीरेकनरनूसार दरवाढ केली. त्यामुळे साधारणत: एका गाळ्याचे भाडे तीन हजारांहून थेट दहा हजारांच्या घरात पोहचले. त्यामुळे गाळे भाडेकरुंनी तीव्र निषेध नोंदवला. भाडेवाढीमुळे कंबरडे मोडले असून त्यांनी रेडीरेकनूसार भाडे अदा करण्यास हातवर केले. सध्या गाळेधारकांकून जुन्या दराने भाडे अदा केले जात असून रेडीरेकनरनूसार वाढलेले भाडे अदा केले जात नाही.

त्यामुळे महापालिकेला प्रचंड आर्थिक नूकसान (Financial loss) सहन करावे लागत आहे. मागील सहा वर्षात रेडीरेकनर दराचे ५६ कोटींचे भाडे थकले आहे. सर्वाधिक ३० कोटींची थकबाकी ही नवीन नाशिक भागात आहे. महापालिकेचे कर्मचारी भाडे वसूल करण्यास गेल्यास आम्ही शासनाकडून रेडिरेकनरचे दर माफ करुन आणू, असा दम त्यांना भरला जात आहे.पण, आता महापालिका प्रशासन कारवाईच्या पवित्र्यात असून दीड हजार गाळेधारकांना नोटिसा धाडत भाडे भरा अन्यथा गाळे सील करु असा इशारा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com