
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agricultural Produce Market Committee) शेतकऱ्यांचे (farmers) कांदा (onion) विक्रीचे पैसे अडकलेले आहे. नेमकी किती रक्कम थकीत आहे याची तत्काळ दोन दिवसात माहिती मागून घ्यावी.
संबंधित बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची (farmers) संपूर्ण थकित रक्कम अदा करावी. त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा (election) कार्यक्रम राबवावा. शेतकऱ्यांचे थकीत पैसे जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया (Election process) पूर्णपणे थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या (Maharashtra State Onion Growers Association) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून बाजार समिती संचालक मंडळाच्या (Market Committee Board of Directors) निवडणुकीची मतदान प्रक्रिया रोखली जाईल,असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सतिश खरे (District Deputy Registrar Cooperative Societies, Satish Khare) यांना कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदन (memorandum) दिले. यावेळी ज्ञानदेव सानप, जनार्दन सोनवणे, शरद सोनवणे, तानाजी मापारी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सोमवार (दि.२७) पासून जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र, शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करून दोन दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी सिन्नर (sinnar), उमराणे (Umrane), येवल्यासह (yevla) काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यवधी रुपये बाजार समितीत शेतमाल खरेदीचे अधिकृत परवाने असलेल्या व्यापाऱ्यांकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी संबंधित बाजार समित्यांमध्ये सतत चकरा मारुनही अजून देखील शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम अदा करण्याचा शासन नियम असतांनाही गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे बाजार समितीमध्ये अडकलेले आहेत. आपण आपल्या अधिकारात सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची नेमकी किती रक्कम थकीत आहे.
याची दोन दिवसात तात्काळ माहिती मागून घ्यावी आणि संबंधित बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची संपूर्ण थकित रक्कम अदा करावि. त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा.शेतकऱ्यांचे थकीत असलेले पैसे जोपर्यंत दिले जात नाही,तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रोखली जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.