Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापवन एक्स्प्रेस अपघात : 'तो' मृत्यू रेल्वे अपघातात नाही; शवविच्छेदन अहवाल काय...

पवन एक्स्प्रेस अपघात : ‘तो’ मृत्यू रेल्वे अपघातात नाही; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देवळाली कॅम्प (Deolali Camp) आणि लहवित (Lahavit) दरम्यान लोहशिंगवे (Lohshingave) गावाजवळ झालेल्या पवन एक्स्प्रेसच्या (Pawan Express) अपघातात नोंदविण्यात आलेला एक मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे….

- Advertisement -

या अपघातात एक मृत्यू(one death) आणि चार अन्य प्रवासी जखमी (Four injured) झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, अपघात घडल्यानंतर याठिकाणी जो मृतदेह आढळून आला होता, या मृतदेहाबाबत कुणीही दावा दाखल केलेला नाही असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, या मृतदेहाला घटनास्थळावरून हलविण्यात आले. यानंतर या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल (Post mortem report) नुकताच प्राप्त झाला असून या व्यक्तीचा मृत्यू रेल्वे अपघात (Railway Accident) घडल्यानंतर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

हा मृतदेह रेल्वेच्या अस्ताव्यस्त पडलेल्या रूळामध्ये अडकला होता. त्यामुळे ही व्यक्ती रेल्वे अपघातात मृत पावली असल्याचा अंदाज बांधण्यात आला. अद्याप देवळाली कॅम्प (Deolali Camp) पोलिसांनी याबाबत कुठेलीही माहिती दिलेली नाही.

जर ही व्यक्ती परिसरातील असेल तर त्याच्या मिसिंगची काही नोंद शेजारील पोलिसांत झालेली आहे का? किंवा कुणी या मृतदेहाबाबत दावा केलाय का? हे अद्याप समजू शकले नाही.

रेल्वेकडून हा मृत्यू रेल्वे अपघातात झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे रेल्वेचे एक पथक याठिकाणी चौकशी साठी येणार असून याबाबतची माहितीदेखील ट्विटरवरून सुतार यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या