Sanjay Raut : संजय राऊत यांना जेल की बेल? आज सुनावणी

Sanjay Raut : संजय राऊत यांना जेल की बेल? आज सुनावणी

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl land scam case) ईडीच्या (ED) कोठडीत असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार....

असल्याने त्यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन की बेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल ९ तास झाडाझडती घेतली होती. राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यात ही धाड मारण्यात आली होती. त्याचवेळी राऊत यांच्या दादरमधील गार्डन कोर्ट फ्लॅटवरही छापा मारण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापा मारण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तिथेही राऊत यांची चौकशी करून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांची अटक करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com