Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामोहुलीपाड्याच्या नागरिकांची दैना संपेना! रुग्णांना उपचारासाठी डोलीचा वापर

मोहुलीपाड्याच्या नागरिकांची दैना संपेना! रुग्णांना उपचारासाठी डोलीचा वापर

माळेगाव | धर्मराज चौधरी

पेठ तालुक्यातील सुरगाणे उंबरपाडा ग्रुप ग्रामपंचायत पैकी मोहुलीपाडा येथे भारताला 75 वर्षे झाल्यानंतर अद्यापही हे गाव विविध मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे लक्षात येते. या गावाला अद्यापही रस्ता नसल्याने रुग्णांना डोली बांधून रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मतदार संघात आरोग्यासाठी जनतेची होणार्‍या या हेटाळणींकडे कुणी लक्ष देईल का? असा सवाल उपस्थित होत आहे…

- Advertisement -

NCP Crisis : “मी आज केलेली सुरुवात…”; शरद पवारांचा बंडखोरांना इशारा

मीननाथ सदू भोये यांना शेतात काल तीन वाजेच्या दरम्यान अचानक चक्कर आल्याने त्यांना पेठ ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना अखेर सुधाकर पुंडलिक भोये, एकनाथ बळी, सावळीराम भोये, सदू भाये, भरत बळी, संदीप भोये, भीमराव भोये, लक्ष्मीबाई सदू भोये यांनी डोली बांधून रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

उंबरपाडा, ते भाट विहीर हे अंतर 2 ते 3 कि. मी. असल्याने रुग्णांना डोली करुन नेत असतांना तारेवरची कसरात करावी लागते. रस्त्या अभावी दरवर्षीप्रमाणे काही गरोदरमाता व इतर रुग्णांनाही डोली करूनच रुग्णालयात दाखल करावे लागते. पावसाळ्यात नदीनाल्यांना पुर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तसेच कधीकाळी तर विद्यार्थ्यांना शाळा सोडून घरीच थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सुरगाने उंबरपाडा पैकी मोहुलीपाडा येथील साधारण 256 लोकसंख्या असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाही.

शरद पवारांची मोठी कारवाई; प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

अंगणवाडी आहे परंतू उंबरपाडा येथील अंगणवाडी सेविका येतात. या अंगणवाडीमध्ये साधारण 20 ते 25 विद्यार्थी आहे. मोहुलीपाडा परिसरातील रुग्णांना जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी जावे लागते. आदिवासी उपयोजनेतून रस्ता मंजूर होता पण ठेकेदारांनी दोन्हीही गावाला रस्ता जोडला नाही. जेसीबी गटार काढली खडी पसरून माती मुरूम न टाकता रस्ता तयार केला. त्यानंतर नागरिकांनी स्वतः जेसीबी लावून रस्ता तयार केला. सभामंडपाचे काम आजही अर्धवट असल्याने ते पूर्ण केव्हा होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या गावात तर स्मशानभूमी नसल्याने अत्यंसंस्कार उघड्यावरच करावे लागत आहे. पावसाळ्यात पळसाच्या पानाचा आधार घेवून अत्यंसंस्कार करावा लागत आहे. भारताला स्वातंत्र्य 75 झाली तरी गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही पाहिजे तसा गावाचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या मुलभूत सुविधांकडे लक्ष देवून त्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांची हकालपट्टी; अजित पवार गटाकडून मोठी घोषणा

- Advertisment -

ताज्या बातम्या