'वंदे भारत'मध्ये प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

'वंदे भारत'मध्ये प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

मुंबई | Mumbai

भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) सुरु करण्यात आलेल्या 'वंदे भारत' एक्स्प्रेस (Vande Bharat' Express) बाबत प्रवाशांच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून या एक्स्प्रेसमध्ये असणाऱ्या सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat express) अनेक मार्गावर सुरु करण्यात आली आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे.

मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार असून यापार्श्वभूमीवर सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना महाराष्ट्रीयन पदार्थांची (maharashtrian food) चव चाखता येणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना (foods) प्राधान्य देण्यात येणार असल्याने महिलांना रोजगाराची नवी संधी देखील निर्माण होणार आहे.  

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भारतीय सात्विक परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार, धार्मिक स्थळांना (Religious places) जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर शाकाहारी भोजन सेवा सुरू करण्यासाठी आणि शाकाहारी भोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी IRCTC सोबत करार केला आहे.यामध्ये मेल-एक्सप्रेसमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी या भरड धान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सुरूवातीला हा पुरवठा सीएसएमटी (CSMT) ते शिर्डी आणि सोलापूर (Solapur) वंदे भारत एक्सप्रेसमधून होणार आहे. 

'वंदे भारत'मध्ये प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा
ट्विटरचे बहुचर्चित 'ब्ल्यू टीक' फिचर भारतात लॉन्च; 'या' सुविधा मिळणार

सकाळच्या नाश्त्यामध्ये (Breakfast) साबुदाणा -शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी, बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पदार्थ आहेत. तर जेवणासाठी शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय प्रवाशांना देण्यात येणार आहे. यासह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना नाश्त्यामध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबीर वडी, भरड धान्यांचे थालीपीठ, साबुदाणा वडा ठेवण्यात आला आहे. मांसाहारी खवय्यांसाठी सावजी चिकन, कोल्हापुरी तांबडा रस्सा देखील पुरविण्यात येणार आहे. यामुळे शाकाहरी बरोबरच मांसाहारी पदार्थांची मेजवानी खवय्यांना चाखता येणार आहे.

'वंदे भारत'मध्ये प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा
काँग्रेसकडून पटोलेंना 'ना-ना'?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com