Buldhana Accident : "बस डिव्हायडरला धडकली अन् पेट घेतला, आम्ही काचा फोडून..."; बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती

Buldhana Accident : "बस डिव्हायडरला धडकली अन् पेट घेतला, आम्ही काचा फोडून..."; बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती

बुलढाणा | Buldhana

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपरखुटा गावाजवळ शुक्रवार (दि.३० जून) मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू (Death) झाला. तर आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत.

ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला (Nagpur to Pune) जात होती त्यावेळी ही भीषण अपघाताची घटना घडली. अशातच आता या अपघातानंतर १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांनी (Two Passengers) या अपघाताचा थरार सांगितला आहे. हे दोन प्रवासी काच फोडून बाहेर पडल्याने त्यांचा कसाबसा जीव वाचला.

Buldhana Accident : "बस डिव्हायडरला धडकली अन् पेट घेतला, आम्ही काचा फोडून..."; बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती
समृद्धी महामार्गावर अग्नितांडव; बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

याबाबत माहिती देतांना प्रवाशांनी सांगितले की, आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने बस (Bus) रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. बस पलटी झाल्यानंतर आम्ही बसची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडलो.

बस उलटल्यानंतर बसला आग (Fire) लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन (Police and Fire Brigade) दलाच्या गाड्या दाखल झाल्यावर त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली, अशी आपबिती प्रवाशांनी सांगितली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com