विमानातून पूर्ण क्षमतेने सुरु होणार प्रवासी वाहतूक

विमानातून पूर्ण क्षमतेने सुरु होणार प्रवासी वाहतूक

नवी दिल्ली। वृत्तसंस्था New Delhi

देशभरात नव्या करोनाबाधितांची corona संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे.

त्यासोबतच, देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण होत असून त्याचा वेग देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय Big decision regarding air transport घेतला आहे.

येत्या 18 ऑक्टोबरपासून देशातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना पूर्ण 100 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार, 18 ऑक्टोबरपासून विमानांमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करता येणार आहे. सध्या ही मर्यादा 85 टक्के इतकी आहे.

Related Stories

No stories found.