एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

दिवसेंदिवस विमानात गैरवर्तन होण्याचे प्रकार वाढत असून विमानामधून (Flight) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून त्यांच्या सहप्रवाशांसोबत अयोग्य वर्तन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विमान हवेत असताना प्रवाशाकडून क्रू मेंबरला मारहाण (Beating) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर; ‘हे’ आहे कारण

याबाबत अधिक माहिती अशी की, एअर इंडियाच्या (Air India) दिल्ली लंडन AI-111 या विमानाने लंडनसाठी टेक ऑफ केले होते. त्यानंतर एका प्रवाशाचे क्रू मेंबर्ससोबत भांडण (quarrel) झाले. त्यावेळी विमानातील इतर सहकाऱ्यांनी या प्रवाशाची समजूत घालत लेखी इशारा बजावला.

शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मात्र, तरीही या प्रवाशाने (Passenger) क्रूच्या सदस्यांसोबत मारामारी केली. त्यामध्ये दोघे जण जखमी झाले. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा दिल्लीला परत आणले. त्यानंतर या प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले असून त्याच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदविण्यात आला आहे.

पारस दुर्घटना प्रकरण : सरकार मृतांच्या वारसांना मदत करणार; फडणवीसांची माहिती

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्रवाशाकडून महिलेच्या सीटवर मद्यधुंद तरुणाने लघवी केल्याची घटना घडली होती. त्यावेळी त्याने इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न देखील केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *