Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हा : मनपा आयुक्तांचे आवाहन

सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हा : मनपा आयुक्तांचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( Swatantryacha Amrut Mahotsav ) अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यात ‘ स्वराज्य महोत्सव’ ( Swarajya Mahotsav )चे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्वराज्य महोत्सव अंतर्गत परिशिष्ट-३ मध्ये नमूद केल्यानुसार राज्यस्तरावरील कार्यक्रमाच्या नियोजनामधील ‘समूह राष्ट्रगीत गायन’ हा उपक्रम १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात खासगी,शासकीय,तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा,महाविद्यालये, शैक्षणिक संस्था,विद्यापीठे या मधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य आहे.

सकाळी ठीक ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरवात होईल व सकाळी ११.०० ते११.०१ या एका मिनिटांमध्ये गायन केली जाईल, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी केले आहे.

खासगी आस्थापना,व्यापारी प्रतिष्ठाने,संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये,केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच सर्व नागरिकांनी दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आहे. त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे.समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते- अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये , याची सर्व यंत्रणांनी व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे नागरीकांना आवाहन.

- Advertisment -

ताज्या बातम्या