पार्थ पवार
पार्थ पवार
मुख्य बातम्या

SSR : पार्थ पवार बोलले, ‘ सत्यमेव जयते ’

भाजपकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली | Delhi

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय CBI कडे दिला. त्यानंतर पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे टिवट केले. तर भाजप नेता किरीट सोमया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.Parth Pawar says satyamev jayate

दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारले होते.माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो अपरिपक्व आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ यास फटकारले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com